# ऑनलाईन बि-स्टेटमेंट जनरेशन प्रणालीमध्ये आपले स्वागत आहे; सदर प्रणालीव्दारे भविष्यासाठी विद्यार्थ्यांची सविस्तर माहिती जतन राहील. आणि तसेच सदर प्रणालीव्दारे लाभार्थ्यांचे प्रस्ताव निकाली काढणे सोयी होईल.!
# सन 2020-21 मधील अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्याचे महाविद्यालयास प्राप्त झालेल्या देयकाप्रमाणे उपयोगिता प्रमाणपत्राची माहिती व प्रत अपलोड करण्यासाठी : : Utilization Certificate : : लिंकला क्लिक करावे..!

: : About Scheme : :

सैनिक शाळेमध्ये शिकणाऱ्या विजाभज व विमाप्र विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता

१ . शासन निर्णय क्रमांक : इबीसी - १०७४ / ५६४२३ / डेस्क - ५ , दि . ०६ ऑगस्ट १९७६.
२ . शासन निर्णय क्रमांक : इबीसी - २००३ / प्र . क्र . १८४ / मावक - २ / दि . १७ सप्टेंबर २००३.

योजनेचा उदेश : 
१ विजाभजव विमाप्र वर्गाच्या विद्यार्थ्यांना सैनिक शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे.
२ सैनिकी प्रशिक्षण घेऊन पोलीस व सैन्य भरतीत नोकरीची संधी उपलब्ध करुन देणे.
३ विद्यार्थ्यांना शैक्षणिक बाबींसाठी आर्थिक सहाय्य उपलब्ध करुन देणे.

लाभाचे स्वरुपः . 
१. सातारा सैनिकस्कुल भोसला , मिलीटरी स्कुल नाशिक व पुणे येथील एसएस . पी . एम . एस . या सैनिक शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्यावर होणारा संपूर्ण खर्च.
२ . राज्यातील इतर शासन मान्य सैनिक शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रत्येकी रु . १५ , ००० प्रमाणे वार्षिक प्रतिपूर्ती.

योजनेच्या अटी : 
१ . विद्यार्थी हा विमुक्त जाती / भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील असावा.
२ . प्रवेशिताच्या पालकाचे वार्षिक उत्पन्न रुपये १ लाख च्या मर्यादित असावे.
३ . प्रवेशित हा शासनमान्य अनूदानित / शासकीय / विनाअनुदानित संस्थेत शिक्षण घेत असला पाहिजे.

संपर्क 
१ . संबंधित जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त , समाज कल्याण.
२ . संबंधित महाविद्यालयाचे मुख्यध्यापक / प्राचार्य योजना संपर्क.